आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकारिणी जाहीर:कालिका महिला मंडळाचा‎ नारीशक्तीसाठी पुढाकार‎

सिडकाे‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंटवाडी येथील कालिका महिला‎ मंडळाच्या वतीने हळदी- कुंकू‎ कार्यक्रम औदुंबर वाटिकेत झाला.‎ नारीशक्तीसाठी पुढाकार अन्‎ त्यात सहभाग, बेटी बचावसाठी‎ प्रयत्न करणे हाच निश्चय व्यक्त‎ करत महिलांनी वाण दिले.‎ कार्यक्रमात महिला मंडळाची नूतन‎ कार्यकारिणी घाेषित करण्यात‎ आली. सन २०२३-२४ या‎ वर्षासाठी मंडळाच्या अध्यक्षपदी‎ उज्ज्वला रवींद्र साेनजे यांची‎ सर्वानुमते निवड करण्यात आली.‎ याप्रसंगी महिला मंडळाच्या‎ वतीने विविध स्पर्धा, खेळ घेण्यात‎ आले. गत वर्षभरात मंडळाच्या‎ वतीने घेण्यात आलेल्या विविध‎ उपक्रमांची माहिती अध्यक्ष लता‎ पाखले यांनी दिली.

तर मंडळाच्या‎ तर्फे वर्षभरात घेण्यात येणाऱ्या‎ उपक्रमांची माहिती देण्यात आली.‎ कार्यक्रमास मनीषा सोनजे, सुवर्णा‎ अमृतकार, माधवी येवला, नम्रता‎ बावीस्कर व इतर कार्यकारिणी‎ सदस्य उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन मनीषा सोनजे यांनी‎ केले. ६० ते ७० महिलांनी‎ उपक्रमात सहभाग घेतला.‎ खेळाच्या माध्यमातून महिलांनी‎ आपल्यातील गुणदर्शन घडविले.‎ मंडळाच्या नूतन अध्यक्षा‎ उज्ज्वला साेनजे यांनी आगामी‎ वर्षात शहरात महिलांचा आवाज‎ बुलंद करणार असल्याचे सांगून‎ विविध उपक्रमात सहभागी‎ हाेण्यासाठी आवाहन केले. नवीन‎ कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार‎ यावेळी करण्यात आला. मंडळातर्फे‎ विविध उपक्रम घेण्याबाबत बैठकीत‎ चर्चा झाली.‎

बातम्या आणखी आहेत...