आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:कापडणीस दुहेरी हत्याकांडात महत्त्वाचे पुरावे सापडले; नानासाहेब कापडणीस यांचा लॅपटॉपही संशयिताकडून जप्त

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस आणि त्यांचा मुलगा डाॅ.अमित या दोघांच्या खुनाशी संबंधित महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मृतदेह फेकलेल्या ठिकाणापासून चारही दिशेने पोलिस पथकाने कसून शोध घेतला असता मृतांच्या अंगावरील कपडे सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. आरोपी राहुल जगताप याने मृतांची अोळख लपवण्यासाठी दोघांच्या अंगावरील कपडे काढून ते फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही मृतदेह मोखाडा आणि राजूर पोलिसांनी अोळख न पटल्याने दफन करून ठेवले आहेत.

मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस, त्यांचा मुलगा डाॅ. अमित यांची मालमत्ता हडप करण्यासाठी संशयित राहुल गौतम जगताप याने खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. कापडणीस यांचे शेअर्स विक्रीचे पैसे स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी राहुल जगतापला अटक केली. त्याने नानासाहेब यांचा गिरणारे शिवारात गळा आवळून खून केला. कारमधून मोखाडा येथे मृताच्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले स्पिरिट टाकून चेहरा जाळला. त्यानंतर तर दहा दिवसांनी अशाच प्रकारे डाॅ. अमित यास त्र्यंबकेश्वर येथे नेले. तेथून पुढे राजूर जि. अहमदनगर येथे नेऊन डोक्यात दगड टाकून खून केला. मोखाडा, राजूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.

महत्त्वाचे पुरावे सापडले
तीन दिवसांपूर्वी पथकाने राहुलच्या फ्लॅट आणि उषाकिरण सोसायटीमधील एका बंगल्यातून कापडणीस यांचे चेकबुक, एटीएम कार्ड, त्याचे पिन नंबर असलेली वही जप्त केली. तसेच शेअर्सची सर्व माहिती आणि मालमत्ता संदर्भात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. कापडणीस यांचा लॅपटाॅपचा डेटा घेण्यासाठी राहुल याने एका साॅफ्टवेअर दुकानात तो दिला होता. संबधित दुकानदाराने पोलिसांना तो लॅपटाॅप आणून देत तपासात मदत केली आहे. संशयित हा नानासाहेब कापडणीस यांच्या पत्नीचा माजी विद्यार्थी आहे. वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...