आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:कपिला नदीला मिळाली ओळख; मनपाने लावला नावाचा फलक

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक कपिला नदीला अखेर ओळख मिळाली. नदीवर अखेर नाशिक महानगरपालिकेने नावाचा फलक लावला आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष योगेश बर्वे, दीपक बैरागी, सुनील परदेशी, रोहित कानडे, प्रकाश बेळे यांच्यासह पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. अनेक वर्षांपासून नदीच्या नावाचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी कपिला नदी संवर्धन समितीच्या वतीने करण्यात येत होती.

याची दखल घेत पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांनी फलक लावण्याच्या सुचना दिल्या. समितीच्या वतीने नदीच्या किनारी वृक्षारोपण करण्यात आले. जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनीदेखील कपिला नदीला ओळख निर्माण व्हावी याकरिता आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत निशिकांत पगारे यांनी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांना निवेदन देत हा लढा सुरू केला होता. यासाठी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...