आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेंडर मंजूर:करंजवण योजना, दाेन वर्षांत मनमाडकरांना राेज पाणी ; 72 किमीची भूमिगत जलवाहिनी

मनमाड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३०५ कोटी रूपये खर्चाच्या हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणीपुरवठा योजनेचे टेंडर अखेर मंजूर करण्यात आले आहे. ते उल्हासनगरच्या ईगल कंपनीला देण्यात आले आहे. योजना पूर्ण करण्याची मुदत दोन वर्ष असली तरी ती केवळ पुढील अठरा महिन्यांतच पूर्ण केली जाईल, असे आश्‍वासन कंपनीने नगरपालिकेला दिले असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. करंजवण धरण ते वागदर्डी धरण अशी ७२ किमीची ही भूमिगत ३६ इंची व्यासाची जलवाहिणी आहे. यामुळे नेहमी टंचाई सहन करणाऱ्या मनमाडकरांना दाेन वर्षात राेज पाणी मिळेल, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

तीन महिन्यांपासून अनेकदा फेरटेंडर काढूनही या योजनेची निविदा भरण्यास कंत्राटदार पुढे येत नव्हते. राज्य शासनाकडून या योजनेसाठीचा प्राथमिक हप्ताही नगरपालिकेकडे जमा झालेला आहे. सदर कंत्राटदाराने या योजनेसाठीच्या २०० कोटी रुपये पाइप खरेदीची ऑर्डरही दिलेली असल्याची माहिती आमदार कांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या योजनेसाठी तीन महिन्यांत अनेक कंत्राटदार पुढे आले होते. परंतु योग्य त्या पात्रतेच्या कंत्राटदाराची तपासणी सुरू होती. अखेर अनुभवाचा निकष लावून काटेकोर तपासणीअंती या स्वरूपाच्या कामाचा दीर्घकालीन अनुभव असलेली व सुमारे १० हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेल्या ईगल कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. दि. १४ नोव्हेंबरला या योजनेची नगरपालिकेने दिलेली वर्कऑर्डर कार्यान्वित होईल. योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्याच हस्ते पुढील महिन्यात होईल. त्यानंतर १८ महिन्यांतच ही योजना पूर्ण होईल.

बातम्या आणखी आहेत...