आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक योगदान:कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांना अभिवादन ; मराठा हायस्कूलमध्ये प्रतिमापूजन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलमध्ये कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे होत्या. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक रमाकांत मोरे, पर्यवेक्षक प्रकाश पवार, शिवाजी शिंदे, रंजना घंगाळे उपस्थित होते. कर्मवीर ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळ सत्र व दुपार सत्र या दोन्ही सत्रात घेण्यात आला. सकाळ सत्रात इयत्ता पाचवी (ग)च्या वर्गाने कार्यक्रम सादर केला तर दुपार सत्रात इयत्ता नववी (ई) च्या वर्गाने कार्यक्रम सादर केला. इयत्ता पाचवी (ग)चा विद्यार्थी संग्राम अहिरराव तसेच समीक्षा इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. इयत्ता नववी (ई) ची विद्यार्थिनी नंदिनी अहिरे व वेदांत निकम यांनी ॲड. विठ्ठलराव हांडे यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.

वारुंगसे म्हणाल्या, महाराष्ट्रात लढाऊ नेते म्हणून ओळखले जाणारे ॲड. विठ्ठलराव हांडे म्हणजे सक्षम नेतृत्व होते. नाशिक जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षणाची गंगा खेडोपाडी पोहोचावी यासाठी तेे कार्यरत राहिले. त्याचबरोबर जनसामान्यांच्या आवश्यक प्रश्नांसाठी अनेक चळवळी त्यांनी केल्या. सूत्रसंचालन पयोष्णी शिंदे व अवनी भोर यांनी केले. इयत्ता नववी (ई)ची विद्यार्थिनी नेत्रा गोळे व इयत्ता पाचवी (ग) विद्यार्थिनी समीक्षा इंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षिका जयश्री बर्वे व सविता साळुंखे यांनी विशेष मेहनत घेतली.

बातम्या आणखी आहेत...