आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समितीचे संस्थापक, सहकार आणि शिक्षणमहर्षी, कुळ कायद्याचे जनक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांची ६१ वी पुण्यतिथी महात्मा गांधी विद्यामंदिर मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. कर्मवीर हिरे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान होते. शेतकऱ्यांचे कैवारी, दीनदलितांचे आश्रयदाते, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या कर्मवीर हिरे यांनी ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ या तत्त्वाला अनुसरून महात्मा गांधी विद्यामंदिर या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, कर्मवीर भाऊसाहेब हिरे म्हणजे एक अष्टपैलू नेतृत्व, थोर स्वातंत्र्यसेनानी, कष्टकरी व बहुजनांसह अठरापगड वर्गांच्या सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र देणारे सहकारमहर्षी, शिक्षणमहर्षी, क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान देत क्रीडापटूंच्या अडचणी सोडवण्यासाठी कायमच ते कटिबद्ध राहिले. विश्वस्त प्रतीक काळे, डॉ. प्रदीप. जी. एल. यांच्यासह यावेळी संस्थेचे सर्व विश्वस्त, संचालक, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.