आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसबा पोटनिवडणुकीत विजय, नाशिकमध्ये मविआचा जल्लोष:काँग्रेस कार्यालयातच ठाकरे गट राष्ट्रवादीकडून पेढे वाटप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल, फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून विजय साजरा केला या याप्रसंगी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते.

मविआच्या एकजूटीचा विजय - छाजेड

हा जनतेचा विजय असून महाविकास आघाडीचा एकजुटीचा विजय आहे. कसब्यातील जनतेने महागाई बेरोजगारी आणि बेकायदेशीर सरकारच्या विरोधात मतदान केले त्याबद्दल सर्व मतदारांचे अभिनंदन. असे मत याप्रसंगी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केले.

भाजपच्या सत्तेचा गैरवापर

भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा गैरवापर या निवडणुकीत केल्याने त्यांना पराभव आला सामोरे जावे लागले त्याबरोबरच वाढती महागाई सिलेंडरचे वाढते दर सामान्य जनता केंद्र व राज्यातील सरकारच्या आश्वासनांना कंटाळलेले आहे असा आरोप छाजेड यांनी केला. त्याच वेळेस राज्यातील शिवसेना-भाजपती सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील बागुल, शहरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, माजी आमदार वसंत गीते, नगरसेविका वत्सलाताई खैरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश सरचिटणीस नाना महाले, नगरसेवक प्रशांत दिवे, विलास अण्णा शिंदे, शिवसेना जिल्हाउपप्रमुख महेंद्र बडवे, उपप्रमुख सचिन मराठे, शिवसेना नेते दत्ता गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे, हनीफ बशीर, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे,माजी नगरसेवक गुलजार कोकणी, नगरसेविका आशाताई तडवी, बबलू खैरे, अल्तमश शेख, स्वप्नील पाटील, शोभा मगर, शामल दीक्षित, नितीन काकड, विजय पाटील, मुन्ना ठाकूर, सलमान काझी, आदेश मगर,संतोष हिवाळे, रोहित साळवे, जय साणस आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...