आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सम्यक मित्र मंडळाच्या वतीने सर्वाेत्कृष्ट जाेडी या अनाेख्या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात चित्रा व प्रफुल्ल कटारे हे दांपत्य सर्वाेत्कृष्ट जाेडी ठरली. सातपूर काॅलनीतील जिजामाता शाळेच्या मैदानावर या स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. कलर्स मराठी या वृत्तवाहिनीवरील ‘खट्याळ प्रेमाची तिखटगोड गोष्ट’ या मालिकेत रमा राघवची भूमिका साकारणारे ऐश्वर्या शेटे व निखिल दामले या कलाकारांच्या उपस्थित ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात भरपूर असा प्रतिसाद लाभला.
रमा राघव या कलाकारांच्या जाेडीने स्पर्धेतील जोडीदारांकडून ओढणीला गाठ मारणे, फुगा फुगवणे, रिंग रिंग, डान्स, उखाणे घेणे यासह विविध खेळ खेळवले. विजेत्या जाेड्यांना बक्षीसे देऊन गाैरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फरीदा सलिम शेख व गायत्री सोपान शहाणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माजी नगरसेवक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव महिरे, प्रफुल्ल कटारे, जुनेद शेख, बंटी लभडे, विकी संसारे, अजय वाघिरे, संतोष भवर, नाना चौधरी, विजय उल्हारे आदींसह सम्यक मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.