आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:नावीन्यतेसाठी स्वतःला प्रश्न विचारत राहणे

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी कोणतेही काम ‘का करायचे?’ असा प्रश्न आपण सतत स्वतःला विचारत राहिला पाहिजे. त्यातून सकारात्मक भाव निर्माण हाेऊन काम हाती घ्यायचे की नाही? काम हाती घेतल्यानंतरचे परिणाम कळतात, असे मार्गदर्शन डॉ. वेंकटेश राघवन यांनी के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिलतर्फे ‘इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ या विषयावर बाेलताना केले.जर्मनी येथील टीडीके इलेक्ट्राॅनिक्स कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट डॉ. वेंकटेश राघवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त मा. चांगदेवराव होळकर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी प्रास्ताविकात संस्थेची ५० वर्षांतील वाटचाल व भविष्यातील योजना तसेच के .के .वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इनोव्हेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंटबाबत आढावा घेतला. प्रा. डॉ. आर. के. मुंजे यांनी प्रमुख मान्यवरांचा परिचय केला.

याप्रसंगी ज्या प्राध्यापकांनी नामांकित जर्नल्समध्ये शोधनिबंध लिहिले आहेत अशांना सन्मानित केले गेले. यात डॉ. एस. एस. बाणाईत, डॉ. आर. के. मुंजे, डॉ. एम. पी. ठाकरे, डॉ. एस. ए. पाटील, डॉ. पी. जे. पवार, स्मिता चौधरी आणि अर्चना मौर्य या प्राध्यापकांचा समावेश होता. डॉ. जी. बी. डावरे समन्वयक हाेते. आर. एम. बोरा यांनी सूत्रसंचालन तर प्रा एस. एन. चौधरी यांनी आभार मानलेे. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी उपक्रमाचे काैतुक केले.

बातम्या आणखी आहेत...