आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळाले:मास्टर लाइट हाऊसचे गोदाम खाक; गंजमाळ येथे लागलेल्या आगीत इलेक्ट्रिकल साहित्य जळाले

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंजमाळ येथील मास्टर लाइट हाऊसच्या गोदामाला लागलेल्या आगीमध्ये लाखोंचे इलेक्ट्रिकल साहित्य जळून खाक झाले. रविवारी (दि. २०) सायंकाळी ५ वाजता हा प्रकार उघडकीस आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी अगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, गंजमाळ येथे मास्टर लाइट हाऊस या इलेक्ट्रिकल विक्री दुकानाच्या वरच्या मजल्यावरील गोदामाला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. खिडकीतून आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकल्याचे निदर्शनास आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्तीचे पर्यत्न केले. इमारत मोठी असल्याने जवानांना आग विझवण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.

अगीच्या दोन घटनांमुळे पंचवटीतील बंब दाखल
हॅप्पी होम कॉलनीत आग लागल्याने मुख्य कार्यालयाचे बंब तिकडे गेले. याचवेळी गंजमाळ येथेही आग लागल्याने पंचवटीचे अग्निशमन बंब पाचारण करत मास्टर मॉल येथील आग नियंत्रणात आणली.

बातम्या आणखी आहेत...