आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या बारा गाड्या ओढण्याचा‎ कार्यक्रम‎:तिसगावला खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तिसगाव येथील श्री खंडेराव‎ महाराज यात्रोत्सवास सोमवार (दि. ३०‎ जानेवारी) पासून उत्साहात प्रारंभ झाला.‎ यात्रोत्सवानिमित्त दि. ५ फेब्रुवारीपर्यंत‎ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎ यात्राेत्सवास सोमवारी घटस्थापनेने‎ प्रारंभ करण्यात आला. दि. ३ रोजी जय‎ मल्हार वाघे मंडळ सहपार्टी यांचा जागरण‎ गोंधळाचा कार्यक्रम झाला .

दि. ४ रोजी‎ सायंकाळी ७ वाजता प्रतिजेजुरी श्री‎ मल्हारी मार्तंड देवस्थान संस्थापक गुरुवर्य‎ योगेश महाराज गवारे (पाचोरेवणी) यांचे‎ आशीर्वचन होऊन महाप्रसाद व त्यानंतर‎ शिवरामभाऊ सहपार्टी न्हनावे यांचा‎ कार्यक्रम होईल. दि. ५ रोजी सकाळी ८‎ वाजता गंगाजल व काठी मिरवणूक होऊन‎ सायंकाळी ६ वाजता विकास अण्णा गांगुर्डे‎ यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्याचा‎ कार्यक्रम होईल व रात्री ९ वाजता संत‎ सावता वाघे मंडळ यांचा राहडी‎ जागरणाचा कार्यक्रम होणार आहे.‎ कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे‎ आवाहन यात्राेत्सव समितीच्या वतीने‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...