आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सावकाराकडून व्यापाऱ्याचे अपहरण; महिलेचा विनयभंग

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी परिसरात एका खासगी सावकाराने १० टक्के व्याज व त्यावर चक्रवाढ व्याज आकारून कर्जाची वसुली करताना संबंधित व्यापाऱ्याचे अपहरण केले. पैसे काढून घेण्याबराबेरच महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पाेलिस ठाण्यात सावकार संशयित चेतन प्रकाश बाेरकर (रा. तांबाेळी गल्ली, हिरावाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा परिसरात कर्ज वसुलीच्या धमक्यांनी त्रस्त गौरव व नेहा जगताप यांनी आत्महत्या केली.

आता पंचवटीत खासगी सावकाराने घरात शिरून विनयभंग केल्याचा प्रकार समाेर आला आहे. पाेलिसात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित सावकार चेतन याने १० टक्के व्याजाने तिच्या पतीला हात उसनवार पैसे दिल हाेते. फेब्रुवारी २०२० मध्ये संशयित चेतनकडून वेळोवेळी चार लाख ५० हजार रुपये १० टक्के दराने घेतले होते. ते पैसे न दिल्याने चेतनने पीडितेच्या पतीस त्याच्या कारमध्ये बळजबरीने बसवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने ऑनलाइन पद्धतीने चेतनला ५० हजार रुपये दिले व नंतर अडीच लाख रुपये दिले. दरम्यान, २ महिन्यांपूर्वी पीडितेचा पती घरी नसताना चेतन तिच्या घरी गेला व विनयभंग करीत पैसे न दिल्यास काहीही करू शकताे, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पाेलिसांनी चेतनला मंगळवारी (दि. २०) रात्री अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...