आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांसाठी रचला कट!:व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण करणारे तिघे अटकेत; सिन्नर पोलिसांची कारवाई

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर येथील व्यापारी कलंत्री यांच्या 12 वर्षीय मुलाचे खंडणीकरीता अपहरण करणाऱ्या तीघा खंडणीखोरांना अटक करण्यात आली आहे.

सिन्नर पोलिस ठाण्याच्या पथकाने संशयितांचा शोध घेत संगमनेर येथून ताब्यात घेतले.रोशन नंदु चव्हाण, यश संदीप मोरे, आकाश भास्कर दराडे असे अटक केलेल्या संशयितांचे नावे आहेत.

याप्रकरणी शुक्रवार दि. 6 रोजी सायंकाळी 5 वाजता शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गुरुवार दि. 5 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सिन्नर येथून तुषार कलंत्री यांच्या 12 वर्षीय मुलाचे कार मधून अपहरण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली होती. ही घटना सोशलमिडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने संशयितांना पकडले जाण्याची भीती असल्याने संशयितांनी रात्री 1 वाजता मुलाला पुन्हा घराजवळ सोडून पलायन केले होते. पथकाने संशयित कारचा शोध घेतला असता संगमनेर परिसरात संशयित कार मिळून आली.

पैशांसाठी कट

संशयितांनी कलंत्री मोठे व्यापारी असल्याने त्यांच्या मुलाचे अपहरण केल्यानंतर 5 ते 10 लाख रुपये मिळतील असा विचार करुन मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला होता.

लहान मुलाचे करणार होते अपहरण

संशयित सुरुवातीला कलंत्री यांच्या लहान मुलाचे अपहरण करण्याचा कट रचला होता. मात्र तो लहान असल्याने आरडाओरड करेल म्हणून आरोपींचा तो प्लॅन फसला.

जुनी कार केली खरेदी

संशयितांना अपहरण करण्यासाठी सिन्नर येथील वाहन बाजारातून 34 हजारांची कार खरेदी केली. तीची नंबरप्लेट काढून ठेवत मुलगा गल्लीत खेळत असतांना अपहरण केले.

सोशलमिडियामुळे घाबरले संशयीत

अपहरणाची माहिती सोशलमिडियावर व्हायरल झाल्याचे संशयितांना त्यांच्या मोबाईलवर समजले. पोलिस मागे असल्याने भीतीपोटी रात्री मुलाला घराच्या जवळ सोडून त्या कारने पलायन केले.

या पथकाने केली कारवाई

निरिक्षक संतोष मुटकुळे, विजय माळी, सुदर्शन आवारी, रामदास धुमाळ, हरिशचंद्र गोसावी, मिलिंद इंगळे, रघुनाथ पगारे, शहाजी शिंदे, समाधान बोराडे, राहुल निरगुडे, चेतन मोरे, यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाला 15 हजारांचे बक्षिस देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...