आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे कुटुंबाकडून 19 बंगल्यांचा हिशाेब घेणारच:सोमय्यांचे आव्हान; प्रॉपर्टीची आयकर विभागाला माहिती दिली नसल्याचा दावा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेकणात ठाकरे कुटुंबियांनी 19 बंगले घेतले. उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावाने अ‌ॅग्रिमेंंट केले, अर्ज केला. प्रॉपटी घेतली. मात्र, आयकर विभागाला त्याची माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांची चाेरी पकडली गेली. ठाकरे कुंटुबियांनी त्या 19 बंगल्यांचा हिशाेब देणे गरजेचे आहे. त्या गायब केलेल्या बंगल्याचा हिशाेब घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असे आव्हान भाजपचे नेते व माजी खासदार किरीट साेमय्या यांनी दिले.

माध्यंदिन ब्राह्मण समाजाच्या सुवर्ण महाेत्सवाच्या सांगता समारंभास कार्यक्रमास किरीट साेमय्या प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सोमय्या म्हणाले की, कोरोना काळात केलेल्या खरेदीची चाैकशी करण्यात मुंबई पालिका आयुक्तांना काेणाची भीती वाटते. मुंबई पालिकेने काेराेना काळात केलेल्या सर्व खरेदीची ऑडिट करावेच लागणार आहे. मुंबईच्या तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर व संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांनी खाेट्या कंपनी स्थापन करत 100 कोटी रुपयांचे ठेका मिळविला.

डिझास्टर मॅनेजमेंटच्या नावाखाली मुंबई महापालिकेत खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची चौकशी करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुंबई पालिका आयुक्तांनी आम्हाला कायदा शिकवू नये.महापालिका आयुक्तांना नेमके कोणाला वाचवायच आहे? हा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी सांगितले की आयएनएस विक्रांतमध्ये घाेटाळा झाल्याचे सांगणारे संजय राऊत यांच्यावर 57 कागद देखील सादर करता आले नाही.

उद्धव ठाकरे सरकारलाही एकही आराेप सिद्ध करता आला नाही.या प्रकरणावरून हायकोर्टाने त्यांना चांगलीच चपराक दिली.राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची ज्यावेळी सत्ता होती, तेव्हा कर्नाटक सरकारकडून किती जमीन घेतली. हे न्यायालयीन प्रकरण आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. त्याचप्रमाणे अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे लवकरच अनिल परब यांचा सर्वां हिशोब चुकता होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

बातम्या आणखी आहेत...