आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:चंपाषष्ठीनिमित्त 22  नाेव्हेंबरपासून पाथर्डी गावात कीर्तन महाेत्सव

इंदिरानगर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी ग्रामस्थांचे कुलदैवत असलेल्या खंडेराव महाराज पुरातन मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त २२ ते २९ नाेव्हेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह आणि यात्रा महाेत्सवाचे आयाेजन करण्यात आहे. राेज सायंकाळी साडेपाच ते सात वाजता हरिपाठ तर रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन हाेईल.

२२ नाेव्हेंबरला पांडुरंग महाराज उगले (परभणी), २३ नाेव्हेंबर गाेविंद महाराज गाेरे (आळंदी), २४ नाेव्हेंबरला शिवलीलाताई पाटील (बार्शी), २५ नाेव्हेंबरला गजानन महाराज वरसाेडकर (जळगाव), २६ नाेव्हेंबरला संजय महाराज धाेंडगे (देवळा)़ २७ नाेव्हेंबरला मधुकर महाराज शेलार (वडगाव), २८ नाेव्हेंबरला डाॅ. गजानन महाराज काळे (जुन्नर) आणि २९ नाेव्हेंबरला प्रकाशानंद महाराज शास्त्री (शिंदखेडा) यांचे कीर्तन हाेणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील राहुल महाराज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाथर्डी येथील शांताराम महाराज बाेडके यांच्या सहकार्याने हा महाेत्सव आयाेजित करण्यात आला आहे. या महाेत्सवावा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयाेजक मदन डेमसे व ग्रामस्थांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...