आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध कार्यक्रमांचे आयाेजन:गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त कीर्तन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गजानन महाराज (श्रीक्षेत्र शेगाव) यांचा ११२ वा संजीवन समाधी दिन १ सप्टेंबर राेजी असून या निमित्त श्री गजानन महाराज सेवा संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे.

सकाळी ८ ते १० श्रींच्या रजतमुखवट्यास लघुरुद्राभिषेक, सकाळी १० ते दुपारी १२ दामोदर महाराज गावले यांचे कीर्तन व आरती, दुपारी १२.३० ते २.३० महाप्रसाद, दु. ३ ते ५ श्रीरंग महिला भजनी मंडळाचे भजन असे कार्यक्रम हाेणार पंचवटीतील सरदार चाैैकातील श्रीगोपाल मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. तसेच द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) च्या वतीने या साेहळ्यानिमित्त दुपारी १२ ते १२.३० या वेळात दिव्यांग विद्यार्थी तथा भक्तांसाठी ब्रेल लिपीमधील आरतीसंग्रह (पुष्पांजली व अथर्वशीर्ष) चे प्रकाशन करण्यात येत आहे. सदर बेल लिपीतील आरतीसंग्रह दिव्यांग भक्तांना विनामूल्य संस्थेच्या वतीने वितरित करण्यात येणार आहे. तसेच, श्री भांडुप गुजराथी सेवा मंडळ यांचे गुडघेदुखीपासून मुक्तता होण्यासाठी प्रसिद्ध असलेले आयुर्वेदिक औषधाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्व संस्थेच्या श्री गजानन महाराजांच्या रजत मुखवट्यांच्या दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...