आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘प्रत्येकाला बंधनापासून मुक्ती हवी असते, त्यासाठी ज्ञान आणि भक्तीची गरज आहे, असे प्रतिपादन चिन्मय मिशनचे विश्वप्रमुख स्वामी तेजोमयानंद यांनी केले. पंचवटीतील चिंचबन येथील चिन्मय चेतना आश्रमात शनिवारी (दि. १०) झालेल्या सत्संग आणि दर्शन सोहळ्यात ते बोलत होते. नाशिक आश्रमाचे प्रमुख स्वामी अद्वैतानंद, पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शोक, मोह आणि भय या तिन्हीमुळे बंधन निर्माण होते.
शोक म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टींचे बंधन, मोह म्हणजे वर्तमान काळातील बंधन आणि भय म्हणजे भविष्यकाळातील चिंता होय. साध्या सोप्या भाषेत त्यांनी प्रवचन देताना त्यावर उपाय म्हणजे ज्ञान होय, असे स्पष्ट केले. ज्ञान आणि भक्ती याद्वारे बंधन नाहीसे होऊ शकते. अनेक शारीरिक आजारांची कारणेदेखील मानसिक आहेत. वेदांतून सुखी जीवनाचे रहस्य सांगितले असल्याचे स्वामी तेजोमयानंद यांनी सांगितले.
अठरा वर्षांनी स्वामीजींचा नाशिक आश्रमास भेट देण्याचा योग आल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. जीवराम गावले यांनी प्रास्तविक केले. सौ. वैद्य यांनी आश्रमाची माहिती सांगितली. स्वामीजींनी हार्मोनियमच्या तालावर मधूर गायन करीत नामस्मरण करून घेतले तर उदयोन्मुख गायिका रागेश्री वैरागकरने भक्तिपर पदे व शास्त्रीय संगीत सादर केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.