आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेलकाता टाटा स्टिल मॅरेथान:नाशिकच्या संजीवनीची बाजी; भारतीय महिला गटात पटकावला प्रथम क्रमांक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मॅरेथान असो की राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा असो नाशिकच्या अॅथलेटीक्स आपल्या कामगिरीने सर्वांचेचे लक्ष वेधून घेतले आहे. हीच परंपरा कायम ठेवत कोलकाता येथे पार पडलेल्या कोलकाल टाटा स्टिल मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या संजीवनी जाधवने बाजी मारली.

जगभरात प्रसिध्द असलेल्या कोलकाता टाटा स्टिल मॅरेथॉनमध्ये जगभरातील धावपटू माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.काेराेनाच्या निर्बंधामुळे दाेन वर्षांनंतर हाेणाऱ्या या मॅरेथॉनकडे सर्वांचे लक्ष लागलेले हाेते. कोलकातील वातावरणामुळे या मॅरेथॉनमध्ये धावतांना स्पर्धकांना माेठी कसरत करावी लागते.अशी परिस्थिती असतांना नाशिकच्या एकलव्य अॅथलेटीक्स व स्पोर्टस इन्स्टिट्यूटची खेळाडू व महिंद्राची प्रायोजकत्व प्राप्त संजीवनीने आपल्या लाैलिका प्रमाणेे खेळ करत स्पर्धेत बाजी मारली. संजीवनीने भारतीय महिला गटात फुल मॅरेथॉनमध्ये एक तास मिनिट आणि 23 सेंकदाची नाेंद करत प्रथम क्रमांक पटकावला. तर 1 तास 37 मिनिटांची नाेंद करत करत माेनिका चाैधरीने द्वतिीय तर 1 तास 39 मिनिट 11 सेकदांची नाेंद करत रेनू सिंगचे तृतीय क्रमांक पटकावला.आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या टाटा स्टिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी करत नाशिकचे नाव संजीवनीने पुन्हा एकदा उंचावले आहे.तसेच तिच्या या कामगिरीमुळे मॅरेथॉनमध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या अॅथलेटीक्सचा दबदबा सिध्द झाला आहे. तिच्या या कामगिरीसाठी प्रशिक्षक विजेंद्रर सिंग यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले.तिच्या या कामगिरीसाठी खेळाडू, धावपट्टूसह नाशिककरांकडून तिचे विशेष अभिनंदन केले जात आहे.

संजीवनीचा डंका कायम

कोलकाता मॅरेथॉनमध्ये बाजी मारत संजीवनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिध्द केले आहे.याच वर्षी संजीवनीने दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला हाेता. तसेच सीनिअर अथलेटीक्स चॅम्पियनशीपमध्ये 10 हजार मीटर गटात देखील विजेतेपद आपल्या नावावर केले हाेते.तिच्या या कामगिरीमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकच्या धावपट्टूचे वर्चस्व सिध्द झाले आहे. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेतही संजीवनी याच प्रकारे कामगिरी करत देशासाठी सुवर्ण पदक प्राप्त करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...