आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:कोरेगाव भीमा आयोगाचे कामकाज 2 ऑगस्टपासून; आठवडाभर पुण्यात साक्ष नाेंदवणार, शरद पवारांच्या साक्षीकडे सर्वांचे लक्ष

नाशिक10 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या साथीमुळे रखडलेले कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज येत्या २ ऑगस्टपासून पुण्यात पुन्हा सुरू होत आहे. पहिल्या आठवड्यात पुण्यातील साक्षी नोंदल्या जाणार आहेत. त्यानंतर मुंबईतील कामकाजासाठी शारीरिक अंतर राखता येईल अशा मोठ्या जागेची आयोगाने मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गेल्या वेळी कोरोनामुळे रद्द झालेली आयोगापुढील साक्ष निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारापूर्वी झालेल्या एल्गार परिषदेच्या खटल्यात अटक करण्यात आलेले फादर स्टेन स्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूनंतर होत असलेली ही साक्ष निर्णायक ठरणार आहे. गेल्या तीन वर्षांत आयोगाला तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. गेल्या मार्चमध्ये अखेरची मुदतवाढ देण्यात आली आणि कोरोनाच्या साथीमुळे आयोगाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

४ एप्रिल २०२० रोजी होणार होती पवारांची साक्ष
१ जानेवारी २०१८ रोजीच्या त्या हिंसाचाराबाबत कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे एक प्रतिज्ञापत्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचेही आहे. गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी पवार यांची चौकशी आयोगापुढे साक्ष होणार होती. मात्र, कोरोनामुळे मार्चमध्येच आयोगाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...