आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:आडगाव विद्यालयात क्रांतिज्योती  सावित्रीबाई फुले जयंती साजरी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल आडगाव शाळेत सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिका शिक्षण दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक मुरलीधर हिंडे, पर्यवेक्षक निवृत्ती भोये, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

शिक्षिका रोहिणी भवर, अंजली पाटील, शुंभागी पाटील, स्वाती सोमवंशी, अर्चना पवार, उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर भाषण केले. संगिता भैलुमे यांनी सावित्री बाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थ्यांनी वंदन गीत सादर केले. आम्ही सावित्रीच्या वारसदार नाट्यछटा सादर करण्यात आली. विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा साकारली.

बातम्या आणखी आहेत...