आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण:क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या याेगदानामुळेच आजची सावित्री घडली;ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचा संवाद

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील क्रांतिकारी स्त्री सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आजची सावित्री घडली आहे. त्यांचा आदर्श घेणाऱ्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती आज त्यांचे वारसदार आहेत. सावित्रीबाईंचा विचार क्रांतीच्या लढाईला प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले. अश्विननगर येथे कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय आणि प्रेरणा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानावरून कांबळे बोलत होते. यावेळी नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी पंकज भारद्वाज यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

इतर मान्यवरांना प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील उपस्थित होत्या. त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेहरू भगतसिंगांच्या विचारावर कृती करा असे मंजूल भारद्वाज प्रतिपादन पुरस्काराला उत्तर देताना केले.

सूत्रसंचालन प्रा.नागार्जुन वाडेकर यांनी तर स्वागत दत्तू तुपे यांनी केले. प्रास्ताविक राजू नाईक यांनी तर आभार डॉ. विशाल जाधव यांनी मानले. यावेळी राजू देसले, तानाजी जायभावे, महेश शिरसाट आदींसह नागरिक उपस्थित होते.

यांना मिळाले पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी मंजूल भारद्वाज यांना देण्यात आला. १० हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह शाल देऊन त्यांना सन्मानित केले. प्रेरणा पुरस्कार स्वानंद जोशी, रविकांत शार्दूल, जिवाजी वाघमारे, डॉ.अग्नेस खरात, विराज देवांग यांना प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...