आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनव व्यासपीठ:अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी सांगड घालण्यासाठी कृषिथॉन 2022 सज्ज

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचे माहितीचे स्टॉल्स, जाणकारांबराेबर भेटीगाठी, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण, पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून समजले जाणारे कृषिथॉन २०२२ हे प्रदर्शन मेगा इव्हेंटसाठी सज्ज झाले आहे. २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान एबीबी सर्कलजवळील ठक्कर डाेममध्ये आयोजित केले असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.कृषिथॉन २०२२ मध्ये यावर्षी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राज्य शासनाचा कृषी विभागासह विविध शासकीय संस्थांचा सहभाग असेल. अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक अॅग्रोडिलर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नर्सरी संघटनेचे सहकार्य मिळाले आहे. सहभागी संस्था, कंपन्या आणि शेतकऱ्यांत उत्साह दिसत आहे, असे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...