आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेठ तालुक्यातील कुळवंडी येथे बंधारा बांधण्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या धरणामुळे 10 गावांतील पाण्याचा दुष्काळ संपणार असून तालुक्याची सिंचन क्षमता 230 हेक्टरने वाढणार आहे. 69.26 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे कुळवंडी शिवारातील गावांचा 20 वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विधान सभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचे नुकतेच भुमीपूजन करण्यात आले.
कुळवंडीच्या या प्रकल्पामुळे कुळवंडीसह घनशेतपाडा, हट्टीपाडा, नाईकपाडा, निमोणीपाडा, कडवईपाडा, बर्डापादा व गावंद येथील गावांना पाणी मिळेल. या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, उपविभागीय जलसंधारण अधिकारी नारायाण डावरे, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, सचिन खंबाईत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकल्पासाठी हरिभाऊ गिते यांच्यासारखे कर्तव्यदक्ष अधिकारी लाभल्याने प्रकल्पाचे काम नक्कीच जलदगतीने हाेईल याबाबतची खात्री असल्याचे झिरवाळ यांनी आपल्या मनाेगतात सांगितले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, नगराध्यक्ष करण करवंदे, मनोहर चौधरी, गोकुळ झिरवाळ, गिरीश गावित, रामदास गवळी, हिरामण पवार, मोहन गावंडे, हनुमंत गवळी, गणेश गवळी आदी उपस्थित होते.
ही आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये
पाणलोट क्षेत्र : 4.95 चौरस किलो मीटर
साठवण क्षमता : 69.26 दशलक्ष घनफूट
सिंचन क्षमता : 230 हेक्टर
धरणाची उंची : 29.24 मीटर
धरणाची लांबी : 375 मीटर
सांडव्याची रुंदी : 56 मीटर
कालवा लांबी : 2 किलो मीटर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.