आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर रेड टाकण्यात आली असून 6 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. संशयित महिलेसह एकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास नाशिक पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहेे.
नेमकी घटना काय?
नाशिक शहरातील शरणपूर रोड परिसरातील सुयोजित मॉडर्न पॉईंट येथील एका स्पा सेंटरवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या स्पा सेंटरवर धाड टाकली असता इथे 6 महिलांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून हे काम करुण घेत असल्याचे पोलिसांना समजले. यात अनेश अरुण उन्हवणे याने दोन गाळे भाडयाने घेऊन त्या ठिकाणी योग वेलनेस स्पा नावाने मसाज पार्लर सुरू केले असल्याची प्रार्थमिक माहिती समोर आली आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहविक्री चालत असल्याबाबत पोलिस तपासात समोर आले. नाशिक शहर पोलिसांनी यांनी कारवाई पथक तयार करून, योग वेलनेस स्पा येथे अनैतिक देहविक्री चालत असल्याची खात्री केली. त्यांनतर पथकाने कारवाई करून मसाज पार्लरच्या नावाखाली अनैतिक देहविक्रीचा व्यवसाय चालवणाऱ्या एक संशयित महिलेसह व ललित पांडुरंग राठोड यांना अटक केली.
दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित महिला व ललीत राठोड या दोघांनी पिडीत महिलांना पैशांचे आमिष दाखवले होते. त्यांनतर संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरता महिलांकडून जबरदस्तीने हे कृत्य करुन घेत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.