आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘हर हर महादेव’ ला समर्थन व विराेधाच्या मुद्यावरून मनसे व राष्ट्रवादी हे दाेन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहे. एकमेकांविराेधात ‘हर हर महादेव’ जणु अशी आराेठी ठाेकत दाेन्ही पक्ष उतरले असले तरी, त्यात चित्रपटापेक्षा आगामी महापालिका निवडणुकीच्या रणनितीचीच समीकरणे असल्याचे दिसून आले. त्यामुळे दाेन्ही पक्षांच्या राजकीय कुरघाेडीचा ‘शाे’ चर्चत राहीला.
गेल्या दाेन ते तीन दिवसापासून ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून जाेरदार राजकीय युद्ध सुरू झाले आहे. छत्रपती संभाजी राजे यांनी चुकीच्यापद्धतीचा इतिहास दाखवल्याचा आराेप केल्यानंतर ताेच धागा पकडून राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे, या चित्रपटाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यामुळे तसेच मराठी कलावंतांशी असलेले मनसेचे निकटचे संबंध बघता त्यांनी समर्थनासाठी मैदानात धाव घेतली आहे. दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या या वादाचा सामना नाशकात सुरू झाला असून राष्ट्रवादीने चित्रपटाचे शाे बंद करावे या मागणीसाठी मल्टीप्लेक्समध्ये धाव घेतली तर मनसेचे चित्रपटाचे तिकिट घेवून शाे सुरू ठेवावा अशी मागणी केली.
चुकीच्या दृश्यामुळे बंदी घाला - राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असून त्यांच्या बाबतीत चुकीचा इतिहास 'हर हर महादेव' चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आला आहे. मुळ, इतिहासाची पूर्णतः मोडतोड करून चेष्टा करण्यात आली आहे. शूरवीरांच्या कर्तृत्वाबाबत खोडसाळपणा केला आहे अशी असंख्य दृश्य आहेत. भावी पिढीची दिशाभुल करण्याचा प्रकार कदापि सहन करण्यासारखा नाही. त्यामुळे हर हर महादेव चित्रपट पुन्हा दाखविण्यात येऊ नये. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, किशोर शिरसाठ, आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अर्धवटरावांमुळे चित्रपटाबद्दल दिशाभूल - मनसे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आवाज लाभलेल्या या चित्रपटाला राजकीय पटलावरून विराेध केला जात आहे. इतिहासाबद्दल चुकीची माहिती ठेवून विराेध करणाऱ्या अर्धवटरावांचा हा प्रताप असल्याचा आराेप मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी महापाैर अशाेक मुर्तडक यांनी केला. पीव्हीआर थिएटरमध्ये जात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रपटाची तिकिट घेत समर्थन केले. राष्ट्रवादीचे नाव न घेता, अलीकडेच काही उनाड कार्यकर्त्यांकडून मराठी चित्रपटसृष्टीविषयी विराेधाचे वातावरण तयार केले जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या मुळावर उठलेल्या लाेकांना मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. यावेळी जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, , उपाध्यक्ष सुजाता डेरे, संदीप भवर, अक्षय खांडरे, अमित गांगुर्ड, अरूणा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.