आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात नागरिकांच्या प्रवासासाठी महापालिकेने सिटीलिंक बस सेवा सुरू केली आहे. मात्र सिटीलिंक च्या वाहकांच्या समस्या या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१) श्रमिक सेनेच्या वतीने गोल्फ क्लब मैदानासर सकाळपासून निदर्शने करण्यात आले. मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
सिटीलिंकच्या शहर बसमधील वाहकांना पगाराची पूर्णपणे सारांश माहिती मिळावी, थकीत दिवाळी बोनस लवकरात लवकर मिळावा, ग्राहकास लावण्यात येणारा प्रत्येक दंड हा चुकीचा व अन्यायकारक आहे, दररोज १२ तास असणारी ड्युटी १४ ते १५ तास होत असून वाहकास ज्यादा कामाचा मोबदला मिळावा, वाहकास आठवडी सुट्टीसह पगारी सुट्टी मिळावी, प्रत्येक महिन्याचा पगार १० ते १५ तारखेदरम्यानच व्हावा, विलंबाने पगार करू नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. कुठलेही अधिकारी वाहकास चोर म्हणून हिणवतात, सिटीलिंकच्या अधिकाऱ्यांकडून गैरवर्तवणूक केली जाते तरी यापुढे वाहकासोबत कुठल्याही प्रकारची गैरवर्तणूक करू नये, तिकीट मशिनच्या तांत्रिक अडचणीमुळे तिकीट प्रिंट न होता मशिनमध्ये अपडेट होते, त्या तिकिटाचे पैसे काहीही चूक नसताना वाहकास भरावे लागतात, त्यामुळे वाहकाना नुकसान सहन करून तिकिटाचे पैसे भरावे लागतात, अशी तक्रार देखील करण्यात आली.
ज्या वाहकांना रात्रपाळीची ड्युटी असते त्यांना रात्रपाळीच्या ड्युटीचा भत्ता मिळावा तसेच मुक्कामाच्या ठिकाणी राहण्याची योग्य सोय करावी अशा विविध मागण्यांसाठी वाहकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात श्रमिक सेना संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल यांनी पाठिंबा दिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.