आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्ञानदिप आधार आश्रमात अल्पवयीन मुलांकडून श्रमाचे कामे करुन घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. आडगाव पोलिसांनी मोरेच्या विरोधात बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित मोरेच्या विरोधात बलात्काराचे 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मोरेची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, जानेवारी 2020 ते एप्रिल 2022 या कालावधीत द किंग फाऊंडेशन ज्ञानदिप गुरुकुल आधार आश्रम मानेनगर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असतांना संशयित हर्षल मोरे याच्या वृंदावन नगर येथे रो हाऊस आहे. आश्रमातून या ठिकाणी जाण्यास सांगत धान्य निवडण्याचे काम तसेच कागदी द्रोण बनविण्याचे काम करण्यास लावून मुलांना विना मोबदला वेठबिगाऱ्यासारखी वागणूक देत होता. हे द्रोण तो खुल्या मार्केटमध्ये तसेच होलसेल विक्री करण्यास पाठवत होता.
संशयिताच्या आश्रमात 13 मुली 14 मुलांकडून कामे करुन घेत त्यांची पिळवणूक करत होता. संशयिताने 13 मुलींपैकी 7 मुलींना आश्रमात असतांना हातपाय दाबण्यास सांगून त्यांना मोबाईल मध्ये अश्लिल फिल्म दाखवत त्यांच्यावर अत्याचार करत होता. याबाबत कुणास सांगीतले तर आश्रमातून काढून टाकण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करत होता.
एका 14 वर्षीय मुलीवर संशयिताने अत्याचार केल्यानंतर तीला त्रास झाला. तरी देखील संशयिताने दुसऱ्या दिवशी तीच्यावर बलात्कार केल्याने मुलींने तीच्या बहिणीला घडलेला प्रकार सांगीतल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमातील मुलींच्या चौकशीत 7 मुलींवर अत्याचार केल्याचा जबाब मुलींनी दिला. संशयित मोरेच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना करत आहे. संशयित 14 दिवस पोलिस कोठडीत होता. चौकशीत त्याने सटाणा येथे मुळगावी दोन मुलींवर अत्याचार केल्याचे चौकशीत समोर आहे. सटाणा पोलिस ठाण्यातही संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.