आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनचालकांना फटका:आरटीओ अन् पोस्टात समन्वयाचा अभाव; शेकडो वाहनचालकांना आरसीबुक, परवान्याची प्रतीक्षा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालय व पोस्ट कार्यालयाच्या असमन्वयाचा फटका नागरिकांना बसत आहे. पोस्टातील स्मार्टकार्ड पॅकिंग व आरटीओतील यंत्रणेच्या अडचणीमुळे परवाने पोहाेचण्यासाठी विलंब होत असल्याने वाहनचालकांना गैरसाेयीचा सामना करावा लागत आहे.

50 रुपये शुल्क

आरटीओने टपाल विभागाबरोबर केलेल्या करारामुळे परवाने आणि आणि ‘आरसी’ बुक नागरिकांना घरपोच मिळतात. ही कागदपत्रे घरपोच मिळविण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी 50 रुपये शुल्क आकारले जाते. मात्र, कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरटीओने टपाल विभागसोबत केलेल्या करारानुसार 7 दिवसांच्या आत वाहनविषयक कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे. मात्र, आरटीओ आणि टपाल विभागामध्ये या प्रकरणी समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. याआधी पोस्टात कागदअभावी मोठ्या प्रमाणावर आरसी बुक व लायसन्स पोस्टात अडकले होते. तर आता आरटीओमध्ये अडकले आहे.

कार्यालयाच्या खेटा

आरटीओमार्फत आरसी आणि परवान्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांची रवानगी मुख्य टपाल कार्यालयात करण्यात येते. त्यावेळी आरटीओकडून संबंधित कागदपत्रांविषयीचा ई-मेल टपाल कार्यालयात पाठविण्यात येतो. त्यानंतर कागदपत्रे संबंधित ग्राहक राहात असलेल्या परिसरातील टपाल कार्यालयात पाठविण्यात येतात. याठिकाणी सर्व आरटीओकडून प्राप्त झालेल्या आरसी बुकचे लिफाफे बनवणे, पत्ता टाकणे आणि हे पाकीट पत्त्यावर पाठवण्याचे काम टपाल खात्याचे आहे. मात्र, काही दिवसांपासून आरटीओ पोस्टाकडून आरसीबुक उचलला जात नसल्याने हजारो आरसी बुक आरटीओतच रखडले आहे. तसेच, नागरिकांना वाहन परवान्यासाठी परिवहन कार्यालयाच्या खेटा माराव्या लागू नयेत म्हणून कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेबद्दल माेठ्या अपेक्षा असताना, प्रत्यक्षात मात्र देखील फाेल ठरत असल्याचे चित्र आहे.

फटका वाहनचालकांना

पोस्टात वाहनचालक आरसीबुक संदर्भात माहिती घेण्यास गेल्यानंतर आरटीओतून स्मार्टकार्ड उशिरा येत असल्याचे सांगितले जात आहे. तर, आरटीओत गेल्यानंतर पोस्टातच जा, तिथेच मिळेल, असे सांगितले जात आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत असून आरटीओ आणि पोस्टातील असमन्वय उघडकीस आला आहे.

बातम्या आणखी आहेत...