आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेठ वालचंद हिराचंद यांना भारतरत्न द्या:ललित गांधी सरकारकडे करणार मागणी, त्यांच्या दूरदृष्टीमुळे उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटिश धोरणाविरुद्ध स्थानिक व्यापारी समुदायाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरची स्थापना शेठ वालचंद हिराचंद यांनी केली. महाराष्ट्र राज्याच्या अनेक आर्थिक मुद्द्यावर प्रामुख्याने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतर्गत व बाह्य व्यापार व्यवसाय सुलभ करण्यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन शेठ वालचंद हिराचंद यांनी केले. त्यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी भारत सरकारकडे मागणी करणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

भारताच्या औद्योगिकीकरणाचा प्रमुख आधारस्तंभ, प्रखर देशभक्त आणि स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचे ध्येय शेठ वालचंद हिराचंद यांचे असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

शेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीमुळे देशात उद्योगात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या व राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणारे शेठ वालचंद हिराचंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला सलाम करून अभिवादन केले. शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी भारत सरकारकडे मागणी करणार असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

भारताच्या व महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाचे जनक व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांची 140 वी जयंती बुधवार दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, शेठ वालचंद हिराचंद यांच्या परिवारातील सदस्य चेंबरचे माजी अध्यक्ष श्री. अरविंदभाई दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र चेंबरच्या मुख्य कार्यालयात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, शेठ वालचंद हिराचंद यांच्या परिवारातील सदस्य तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष श्री. अरविंदभाई दोशी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर उपस्थित होते.

शेठ वालचंद हिराचंद यांच्या परिवारातील सदस्य तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष श्री. अरविंदभाई दोशी यांनी शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेठ वालचंद हिराचंद यांनी सुरू केलेले कार्य अविरत सुरू असून महाराष्ट्र राज्य व्यापार, उद्योग क्षेत्रात प्रगतीपथावर जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका महाराष्ट्र चेंबर करत असल्याचे मनोगत व्यक्त केले. शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आदर्श चेंबरच्या माध्यमातून सर्वश्रुत होत असल्याचे सांगितले.

आभारप्रदर्शन उपाध्यक्षा सौ. शुभांगी तिरोडकर यांनी केले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य संदीप भंडारी, प्रदीप मांजरेकर, डॉ. धनश्री हरदास, प्रमोद शहा, उत्तम शहा, सुरेश ठक्कर, गिरीश पारख, प्रदिप मांजरेकर, मानसी मांजरेकर, प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...