आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपानंतर परिस्थितीत सूधारणा:लालपरी सुसाट, विभागातील बसेसची संख्या पोहोचली 630 वर, आषाढीसाठीही नियोजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय विलीनीकरणाच्या मागणीकरत कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी महामंडळाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली हाेती.मात्र आता एसटी कर्मचारी कामावर हजर झाल्याने एसटी सुसाट धावत आहे. विभागातील बसेसची संख्या 630 वर पाेहाेचली आहे. आगामी काळात या बसेसची संख्या आणखी वाढविण्यात येणार असल्याचे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

अनियमित व तुटपुंजे वेतन मिळत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय विलिनीकरणाची मागणी करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पूकारला हाेता. गर्दीच्या हंगामात कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाला माेठा अर्थिक फटका बसला हाेता.

संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा देखील उगारला हाेता. तब्बल सहा महिने सुरु राहिलेला हा संप अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्यात आला आहे. तसेच संपात सहभागी कर्मचाऱ्यांवरील कारवाई देखील मागे घेण्यात आली.संप मिटल्यानंतर एसटी कर्मचारी कामावर हजर झाले. याचमुळे विभागातील बसेसची संख्या 630 वर पाेहाेचली आहे. विभाागात पुणे, औरंगाबाद, मालेगाव, धुळे, दादर यासह विविध मार्गावर बसेस धावत आहे. या बसेसचा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याने एसटीच्या उत्पन्नात देखील चांगली भर पडत आहे. याच पार्श्वभुमीवर आगामी काळात एसटीच्यावतीने बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीसाठी नियाेजन सुरु

पुढील महिन्यात आषाढी एकादशी असल्याने पंढरपूर येथे जादा बसेस साेडण्याचे नियाेजन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. मागेल त्या गावातून एसटी असे नियाेजन एसटीकडून असून त्यादृष्टीने एसटी प्रशासनाच्या वतीने सरपंचांना पत्र देखील पाठविले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...