आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री सहायता कक्ष:मोठ्या दात्यांची सीएम कोविड फंडाकडे पाठ; चार महिन्यांत जमले फक्त 6 कोटी

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॉप 20 देणगीदारांची यादी गेल्या सप्टेंबरपासून बदलली नाही

मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे स्थापन करण्यात आलेल्या कोविड फंडाकडे राज्यातील मोठ्या दात्यांनी पाठ फिरवली आहे. परिणामी, पहिल्या टॉप २० देणगीदारांची यादी गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यानंतर कणभरही बदललेली नाही. राज्यावर एवढे मोठे संकट असताना, जानेवारी ते एप्रिल या गेल्या चार महिन्यांत मुख्यमंत्री सहायता निधीच्या कोविड फंडात फक्त ६ कोटी १४ लाख रुपये जमा झाले आहेत.

शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करीत असताना मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या लोकांच्या सहभागातून उभारलेल्या गंगाजळीचा राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी महत्त्वाचा हातभार लागतो. यापूर्वी सन २०१५ च्या दुष्काळी परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना थेट मदत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीने महत्त्वाचा हातभार लावला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वायत्त ट्रस्ट असलेला हा निधी उद्योग समूह, धार्मिक संंस्था यांच्या देणग्यांमधून उभारण्यात येतो. गेल्या वर्षीपासून यात कोविड फंडाचे स्वतंत्र खाते तयार करण्यात आले आहे. यात सर्वाधिक देणगी देणाऱ्या टॉप २० देणगीदारांची नावे जाहीर करण्यात येतात. मात्र, गेल्या वर्षीच्या ३ सप्टेंबरनंतर एकही मोठा देणगीदार मुख्यमंत्री सहायता निधीत मोठी देणगी देण्यासाठी पुढे आलेला नाही.

इथे करा मदतनिधी जमा
मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड 19)
बँकेचे बचत खाते क्रमांक 39239591720
एसबीआय, मुंबई मुख्य शाखा 400023
शाखा कोड 00300
आयएफएससी कोड SBIN0000300

बातम्या आणखी आहेत...