आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषीप्रधान नाशिक जिल्ह्याला 2009 सालीच कृषी टर्मिनल मंजूर झाले आहे. पण 13 वर्ष उलटूनही त्यात कुठेही प्रगती झाली नव्हती. आता प्रक्रियेने वेग घेतला आहे. नाशिक तालुक्यातील सय्यद पिंप्री येथे 100 एकर व्यावसायिक झोनमधीलच जागा उपलब्ध करुन देण्याची अश्वासन संबधित खात्याच्या सचिवांना दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. त्यामुळे आता टर्मिनल उभारणीस वेग मिळण्याची शक्यता वाढली आहे.
सय्यद पिंप्री येथे टर्मिनलसाठी जी जागा देण्यात आली होती. तेथे मोठे मोठे खड्डे होते. त्यामुळे बरीच वर्ष काम रेंगाळले होते. नंतर टर्मिनल घोटी आणि इतर ठिकाणी उभारण्याची चर्चा सुरु झाली. परंतू सारं थांबून आहे. त्याच ठिकाणी जागा उपलब्धीसाठी प्रयत्न सुरु झाले. त्यातील महत्वाचे म्हणजे, या जागेव शैक्षणिक झोन असल्याने झोन बदलाबाबतही प्रयत्न झाले होते. पण त्यास यश न आल्यानेच पुढे काहीच घडले नव्हते. पण आता मात्र त्याच परिसारत 100 एकर जागा उपलब्ध आहे. या जागेवर व्यावसायिक झोनही आहे. त्यामुळे शैक्षणिक झोन बदलण्याची कुठलिही आवश्यकता नसल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना माहीती दिली.
कृषी टर्मिनल येथे शेतकऱ्यांना शेतीविषय अनेक बाबींची शिक्षणही उपलब्ध असेल. त्यासोबतच मार्केटही उपलब्ध राहाणार असल्याने दुहेरी फायदा होईल. जिल्हाधिकाऱ्यांना या जागेचा प्रस्ताव त्वरीत देण्याचे आदेशित केले असून त्यांनी पहाणी देखील केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.