आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीमुळे बळीराजा हवालदिल:विक्रीसाठी शेतात, बाजारपेठेत काढून ठेवलेला कांदा भिजला; हरभरा, गहू, द्राक्षांचेही नुकसान

लासलगाव | प्रतिनिधी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी उघड्यावर ठेवलेला शेतकऱ्यांचा कांदा अवकाळी पावसामुळे भिजला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी शेतात काढून ठेवलेला तसेच, बाजारपेठेत उघड्यावर ठेवलेला कांदा भिजला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले रब्बी पिके मातीमोल होण्याची भीती आहे.

बळीराजाला एकीकडे कांदा व द्राक्ष यांची कवडीमोल भावाने विक्री करावी लागत असताना दुसरीकडे अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पावसामुळे कांदा मातीमोल

मका, हरभरा, गहू, द्राक्षांचे नुकसान

नाशिकमधील लासलगाव व परिसरात सोमवारी पहाटे 4 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या कांदा पिकाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी कांदा विक्रीच्या गडबडीत आहे. अशात अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसात भिजला आहे. लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचा उघड्यावर असलेला कांदा तसेच मका भिजल्याने नुकसान झाले आहे. यासोबतच पावसामुळे हरभरा, गहू व द्राक्ष पिकांचेही मोठे नुकसान होणार असल्याची भीती वर्तवली जात आहे.

पुढील दोन दिवस अवकाळी

हवामान खात्याने दोन दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील लासलगाव व परिसरात सोमवारी पहाटे 4 वाजेपासून अवकाळी पाऊस आला. विजांच्या कडकटांसह परिसरात पाऊस कोसळत आहे.

हरभरा पिक आडवे

सध्या द्राक्षाचा हंगाम जोरात सुरू असून केवळ 18 ते 20 रुपये प्रति किलोने द्राक्ष विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशात अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेवटच्या टप्प्यात आलेली द्राक्ष सापडणार आहेत. पहाटेपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतात उभा असलेला हरभरा पिक अनेक ठिकाणी आडवे झाले आहे.

लासलगाव बाजारपेठेत साचलेले पाणी. पावसामुळे विक्रीसाठी आणलेली आपलील पिके वाचवण्याची धडपड शेतकरी करत आहेत.
लासलगाव बाजारपेठेत साचलेले पाणी. पावसामुळे विक्रीसाठी आणलेली आपलील पिके वाचवण्याची धडपड शेतकरी करत आहेत.

बाजारपेठेमध्ये शेतीमालाला भाव नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आधीच सुलतानी संकट आहे. अशात पावसाचे वातावरण नसताना अचानक पाऊस होऊन शेतकरी आता अस्मानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.

संबंधित वृत्त

राज्यभरात अवकाळी पावसाचे संकट:छत्रपती संभाजीनगर, नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगरमध्ये सरी; उद्या गारपीठीची शक्यता

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, बुलढाणा, पालघर, अहमदनगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काढे ढग दाटून आले असून हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...