आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप. पू. भगरीबाबा यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह कालावधीत श्री नर्मदा महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती.येथील भगरी बाबा मंदिरात श्री नर्मदा महापुराण कथा व सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
त्यानंतर बाबांची प्रतिमा, पालखी, कथाकार गुरूवर्य ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रूई व श्री नर्मदा माता यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. गौरी पंकज होळकर हिने नर्मदा मातेची वेशभुषा धारण केली. मिरवणुकीत सर्व शाळांचे विद्यार्थी, परिसरातील पुरूष व महिला भजनी मंडळ, बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजार समितीचे सदस्य शिवनाथ जाधव, रमेश पालवे, सचिव नरेंद्र वाढवणे, कांदा व्यापारी ओमप्रकाश राका, दत्तात्रय खुर्दे, प्रवीण कदम, बाळासाहेब दराडे, ओम चोथाणी, संतोष माठा, विलास जगताप, दत्तात्रेय खाडे, मनिष सारस्वत, विलास सोनार, अनिल बांगर, वाल्मिकराव जाधव, सुरेश बोडके, संदीप गोमासे, नाना सुर्यवंशी, बाबा अमरनाथ ग्रुप, प. पू. भगरीबाबा मित्र मंडळ व श्री गायत्री परीवाराचे सर्व सदस्य, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांच्यासह परीसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणूक मार्गावर दत्ता वाघ, दिपा उपाध्ये व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण गावात आकर्षक रांगोळी काढून मिरवणुकीची शोभा वाढवली. यावेळी ज्ञानेश्वर माऊली शिंदे, रूई यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता झाली.
पुण्यतिथी सोहळा यशस्वीतेसाठी प. पू. भगरीबाबा भक्त मंडळ, बाबा अमरनाथ ग्रुप व प.पू. भगरीबाबा दिंडी सोहळ्याचे सर्व सदस्य, बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत, सहाय्यक सचिव अशोक गायकवाड, सर्व लिलाव प्रमुख सुनिल डचके, लेखापाल सुशिल वाढवणे, पंकज होळकर, संदीप निकम, ज्ञानेश्वर जगताप, रामदास गायकवाड, गणेश आहेर, अरूण ठाकरे, योगेश गांगुर्डे, सेवानिवृत्त सेवक दत्तात्रय होळकर, लाला ठाकरे, माथाडी-मापारी कामगार, कांदा भरणार कामगार यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.