आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबरपर्यंतच:आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विवरणपत्र फाईल करण्याची अंतिम संधी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयकर विवरणपत्र हे निर्धारित तारखे पर्यंतच भरले गेले पाहिजे परंतु काही कारणास्तव जर काेणी ते भरू शकले नसतील तर त्यांच्याकरीता एक शेवटची संधी अजूनही उपलब्ध आहे. आर्थिक वर्ष 2021-22 चे आयकर विवरण पत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 पर्यंत असल्यामुळे ज्यांचे विवरणपत्र अद्याप भरलेले नाही, ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विवरणपत्र फाईल करू शकतात. यामुदतीनंतर, 1 जानेवारी 2023 पासून आर्थिक वर्ष 2021-22 चे आयकर विवरणपत्र भरता येणार नाही.

ज्यांनी 31 मार्च 2022 चे आयकर विवरणपत्र अद्याप भरलेली नाहीत, त्यांच्याकरिता 31 डिसेंबर 2022 ही शेवटची मुदत आहे. यानंतर त्या आर्थिक वर्षाचे रिटर्न भरता येणार नाही. याचबरोबर आपण रिटर्न भरलेले आहे परंतु त्यात काही चुका झालेल्या असतील व आपल्याला रिटर्न रिवाईज करायचे असेल तर त्यासाठी देखील 31 डिसेंबर 2022 ही शेवटची तारीख आहे. आयकर कायद्यानुसार दंड भरून 31 डिसेंबर 2022 च्या आत आपले रिटर्न फाईल करून घ्यावीत असा सल्ला कर सल्लागारांनी दिला आहे.

तर कुठलाही दंड नाही

जर आपले एकूण उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपये किंवा त्याच्या आत असेल तर कुठल्याही पद्धतीचा दंड आकारला जाणार नाही. जर उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये दंड लागेल. 5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर पाच हजार रुपये दंड लागेल.

15 डिसेंबरच्या आत भरा ॲडव्हान्स टॅक्स

टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन राजेंद्र बकरे, अध्यक्ष​​​​​​​ म्हणाले की, ॲडव्हान्स टॅक्स तीन टप्प्यात भरावयाचा असतो, पहिला टप्पा हा 15 सप्टेंबर पूर्वी, दुसरा टप्पा 15 डिसेंबर, तिसरा व शेवटचा टप्पा हा 15 मार्च आहे. दुसरा टप्प्यातील ऍडव्हान्स टॅक्स हा 15 डिसेंबरच्या आत भरावयाचा आहे. व्यवसायिक, उद्योजकांनी आपल्या आर्थिक उलाढालीनुसार आपले करदायित्व भरून राष्ट्रीय उत्पन्न वाढवावे जेणेकरून भविष्यात त्याचा सर्वांनाच फायदा होईल.

मुदतीत दाखल करा विवरणपत्र

​​​​​​​​​​​​​​आर्थिक सल्लागार​​​​​​​ योगेश कातकाडे म्हणाले की,आर्थिक वर्ष 2021-22चे आयकर विवरण पत्र भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर पर्यंतच असल्यामुळे जे राहीले असतील त्यांनी ते मुदतीत भरावे कारण यामुदतीनंतर हे विवरणपत्र किंवा बदलही करता येणार नाही हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. याचबराेबर करदात्यांनी स्वतःहून पुढे येऊन आपला ॲडव्हान्स टॅक्स देखिल वेळेत भरून जबाबदारी पार पाडावी.

बातम्या आणखी आहेत...