आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ताणतणावावर हास्य हे उत्तम औषध; अॅड. नितीन ठाकरे यांचे प्रतिपादन

नाशिक5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताणतणावावर हास्य हे उत्तम औषध आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी केले.येथील जिल्हा हास्ययोग समन्वय समितीतर्फे आयोजित गौरव सोहळ्यात ठाकरे बोलत होते. हास्यक्लब ही चांगली संकल्पना असून शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी हास्ययोग हा परिणामकारक व्यायाम प्रकार आहे. व्यासपीठावर हास्यगुरू ङाॅ. मदन कटारिया, सहहास्यगुरू माधुरी कटारिया, जिल्हा समितीचे अध्यक्ष अॅड. वसंतराव पेखळे, महासचिव अश्विनी धोपावकर, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, पराग सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमात हास्ययोगातील विशेष योगदानाबद्दल कै. नानासाहेब सूर्यवंशी यांना मरणोत्तर हास्यरत्न सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पराग व नातू अभिमन्यू यांनी स्वीकारले. यावेळी खळाळून हसण्याने ताणतणाव दूर हाेऊन विविध आजारापासून दूर राहता येते, असे मान्यवरांनी मनाेगतात सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन अॅड. वसंतराव पेखळे यांनी केले हाेते. सूत्रसंचालन जयश्री गावित यांनी केले तर आभारप्रदर्शन अश्विनी धोपावकर यांनी केले. कार्यक्रमास रत्नाकर लुंगे, सुभाष कुलकर्णी, अदिती आघारकर, अरुण वाघमारे, सुनील कोटगी, लक्ष्मीकांत विसावे, शंकरराव सोमवंशी. हरिश्चंद्र वाळेकर, निवृत्त एसीपी गायकवाड, साधना चव्हाण, आबा सोनजे, छाया नवले, माया पाटील, कुसुम मोरे आदींसह हास्यप्रेमी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...