आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा राज्य घटनाबाह्य:कायदा आणण्यापूर्वी घटनेचा अभ्यास करावा - ओवेसी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लव्ह आणि जिहाद एकत्र होऊच शकत नाही. लव्ह जिहादविरोधी कायदा घटनाबाह्य आहे. महाराष्ट्रात यासंदर्भात कायदा आणला जात असल्याने आधी सरकारने राज्यघटनेचा अभ्यास करावा, असा सल्ला एमआयएमचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारला दिला.

नाशिकमध्ये खासगी दौऱ्यावर आले असता ओवेसी यांनी पत्रकारांशी बोलताना सागितले की, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानेही मध्य प्रदेश सरकारच्या अशाच प्रकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. भाजपमधील अनेकांनी अशा प्रकारे लग्न केले. त्यांना भाजपवाले काय करणार? देशात केवळ लव्ह जिहाद हाच एक मुद्दा आहे की बेरोजगारी, हे लक्षात घेतले पाहिजे. संपूर्ण जगात सर्वाधिक बेरोजगार भारतात असून ८ टक्के बेरोजगारी आहे. त्यामुळेच भाजप बेरोजगार तरुणांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि राज्यातील शेतकऱ्यांकडे हे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे, असेही ओवेसी म्हणाले.

वंचितशी युती का तुटली प्रश्नावर थेट उत्तर टाळले
वंचित-एमआयएमची युती का तुटली, यावर प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळून ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांविषयी मला मनापासून आदर आहे. तो यापुढेही राहिल. वंचितांना न्याय मिळावा यासाठी युती करण्यात आली होती. वंचितांना न्याय मिळून द्यायचा असेल तर ते केवळ राजकीय माध्यमातूनच देता येऊ शकते, असे माझे मत आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...