आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:हिरे प्रतिष्ठानतर्फे ‘शैक्षणिक धोरणा’वर आजपासून व्याख्यानमाला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मवीर भाऊसाहेब हिरे प्रतिष्ठानतर्फे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०’ या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन २० ते २२ डिसेंबर सायंकाळी ५ ते ६ वाजता सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृह, नेहरू गार्डनजवळ शालिमार चौक, नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे.

व्याख्यानाचे विषय पुढीलप्रमाणे : पहिल्या दिवशी "गुणवत्ता शाळा प्रशासन आणि नॅबेट मान्यता’ यावर प्रवरानगर ग्रामीण शिक्षण संस्थेचे संगणक विभागप्रमुख प्रा. गिरीश सोनार मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२०’ (शालेय शिक्षण) या विषयावर प्रा.डॉ. चंद्रकांत रावल मार्गदर्शन करतील. शेवटच्या दिवशी "शैक्षणिक धोरण शाश्वत आणि सर्वागीण विकास’ या विषयवार राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (बंगळुरू) मार्गदर्शन करतील. ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असून शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. प्रशांत हिरे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...