आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांकेतिक भाषेत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन:100 मूकबधिरांना शिबिरात कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मूकबधिरांसाठी त्यांच्या सांकेतिक भाषेत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मूकबधिर असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरी यांच्या वतीने करण्यात आले. या शिबिराचा लाभ नागपूर, पुणे, मुंबई तसेच कोकण भागातील १०० पेक्षा जास्त मूकबधिरांनी घेतला. त्यांच्या कायदेशीर अडचणी सोडविण्याबाबत यात मार्गदर्शन करण्यात आले. भारतीय दंडसंहितेनुसार मूकबधिरांना असलेले अधिकार व संरक्षण याबाबत जागरूकता वाढवून त्यांची फसवणूक होऊ नये या दृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुंबईच्या दुभाषी तज्ज्ञ तन्वी जोशी यांचे सहकार्य लाभले.

नाशिकच्या महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने मूकबधिर व्यक्तींना समजेल अशा सांकेतिक भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनवाला व हिंदू समाज सेवा ट्रस्टचे अध्यक्ष मदन जगोटा उपस्थित होते. शिबिरासाठी रोटरीचे अध्यक्ष ओंकार महाले, महसूल अधिकारी अनिल रोकडे, महसूल सहायक पंकज सोनवणे, मूकबधिर असोसिएशनचे सरचिटणीस कशिश छाब्रा आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...