आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:रहिवासी भागात बिबट्याचा मुक्त संचार, तीन तास चालले बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन

नाशिक9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये बिबट्याने तीन तास धुमाकुळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील गंगापूर रोड परिसरात या बिबट्याने तीन तास धुमाकाळ घातला. दरम्यान, त्याला बघण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमली. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना त्या बिबट्याला जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील गंगापूररोड परिसरातील आनंद नगर भागात आज बिबट्या घुसला. सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत परिसरातील बंगले आणि अपार्टमेंटमध्ये या बिबट्याचा लंपडाव सुरू होता. अखेर परिसरातील नागरिकांनी बिबट्या दिसल्याची माहिती वन विभाग व पोलिसांनी दिली. यानंतर वन विभागाचे पथक दाखल झाले.

पथकाने बिबट्याच्या पाऊलखुणाच्या आधारावर शोध मोहिम सुरू केली. काही वेळानंतर बिबट्याने डरकाळी फोडली आणि सुरू झाला बिबट्याला पकडण्याचा खेळ. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वन विभागाला बिबट्याला रेस्क्यू करण्यात अडचणी आल्या. सकाळी दहा वाजेच्या सुमारास अक्षरधाम अपार्टमेंटमध्ये लपलेल्या बिबट्याला डार्ट मारण्यात आला. अखेर तीन तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...