आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बिबट्याचा हल्ला:नाशिकच्या कॉलेजरोड परिसरात घुसला बिबट्या, हल्ल्यात एक महिला जखमी; वन विभागाकडून ड्रोनच्या माध्यमातून शोध सुरू

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली महिला
  • बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी केली होती गर्दी

नाशिकच्या कॉलेज रोज परिसरात आज सकाळी एक बिबट्या घुसला. या बिबट्याने महिलेवर हल्ला केला. यात महिलेच्या हात आणि गालाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्यानंतर बिबट्या परिसरात लपल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. 

हिराबाई रनबावळे असे महिलेचे नाव असून ती येथील रखवालदाराची पत्नी आहे. सदरील परिसर उच्चभ्रू आणि दाट लोकवस्तीचा आहे. परिसरात बिबट्या आल्याचे कळताच येथील लोक बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. वन विभाग आणि पोलिस गर्दी घटनास्थळी दाखल झाले असून ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे. 

0