आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये भीतीचे सावट:पाथर्डी शिवारात बिबट्या जेरबंद

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी गावातील मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाकडून नवले मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. अखेर रविवारी पहाटेच्या वेळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. पाथर्डी गावातील भगवंत नवले यांच्या मळ्यात स्थानिक शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी १५ दिवसांपूर्वी पिंजरा ठेवला होता. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. जयेश नवले सकाळी वीजपंप चालू करण्यासाठी गेले असताना बिबट्या जेरबंद झाल्याचे समजले. त्यानंतर विष्णू नवले, धीरज नवले, पोपट नवले, रोशन नवले, गणेश नवले आदींनी वनविभागाला माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...