आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीती:सिटीसेंटर मार्गावर बिबट्याचे दर्शन; दिवसभर नागरिकांत भीती

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एबीबी सर्कल ते लवाटेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी (दि. १५) सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका कारचालकाला बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या मोकळ्या भुखंडाच्या भितींवरून झेप घेत नासर्डी नदीच्या दिशेने झाडाझुडपात गायब झाला. संबंधीत कारचालकाने आपल्या मोबाइलमध्ये बिबट्याचे छायाचित्रणही केले. ताे व्हिडिओ व्हायरल झाल्याने दिवसभर परिसरात भीतीचे वातावरण होते. दरम्यान वन विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला, मात्र बिबट्या दिसून आला नाही.

नाशिक शहरातील नागरी वसाहत असलेला हा मध्यवर्ती भाग आहे. बुधवारी पहाटे एबीबी सर्कलपासून पुढे सिटीसेंटर दरम्यानच्या रस्त्यावर विवेक वडगे यांना बिबट्या दिसला. वडके हे मोबाईलमध्ये छायाचित्रण करत असताना गाडीच्या आवाजाने बिबट्या सावध होत त्याने कुंपणाच्या भिंतीवर उडी घेत, झुडपांमध्ये गायब झाल्याची माहिती संबंधीत कारचालकाने याबाबत वन विभागाला माहिती दिली. यावेळी वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, विजय पाटील यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी साहित्य घेवुन लवाटेनगर येथे आले. या ठिकाणी पाहणी केली असता, त्यांना काही ठिकाणी मातीवर बिबट्याच्या पंजाचे ठसेही उमटल्याचे दिसून आले. मात्र परिसरात शोध घेतल्यानंतरही बिबट्या दिसून आला नाही.

वळणावर अचानक गाडीसमोर दिसला बिबट्या माझा टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे, मित्राच्या मुलाला पुण्याला सोडविण्यासाठी सकाळी ५.३४ वाजता एबीबी सर्कलकडून सिटी सेंटर मॉलकडे चाललो होताे. ठक्कर डोमच्या पुढील वळणार अगदी चार-पाच फुट पुढे बिबट्या रस्ता ओलांडतांना अचानक दिसला, मी गाडीचे ब्रेक दाबले, आवाजाने बिबट्या रस्ता ओलांडून ठक्कर डोमच्या बाजुला गेला, त्यानंतर मी मित्राच्या मुलाला गाडीमधूनच व्हिडीओ काढायला सांगितला. यु टर्न घेऊन हळूहळू गाडी ठक्कर डोमकडे घेऊन जात असताना एक सायकलस्वार जाताना दिसला त्याला थांबवून मी परत पाठवले, मग गाडीतूनच त्याचा व्हिडीओ काढला, बिबट्या ठक्कर डोमच्या बाजूच्या कंपाउंड वॉलवरून उडी मारून पळाला. यानंतर मी वन विभागातील आमचे मित्र शरद बाराडे यांना हा व्हिडीओ पाठवून कॉल करून माहीती दिली व पुण्याकडे निघालो. - विवेक वडगे, प्रत्यक्षदर्शी

परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी
ज्या परिसरात बिबट्या फिरत आहे, त्या परिसरात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या परिसरात रात्रंदिवस कर्मचारी तयार ठेवले आहे.
- विवेक भदाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक

बातम्या आणखी आहेत...