आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचे दर्शन:पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात दिसला बिबट्या

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात साेमवारी (दि. १२) सायंकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील पर्यटकांसह सुरक्षा रक्षकांमध्ये भीती पसरली. यासंदर्भात, वन विभाग व पाेलिसांना माहिती मिळताच त्यांनी परिसरात धाव घेतली. याठिकाणी वन विभागाच्या पथकाने दीड ते दाेन तास शाेध घेतला, मात्र ताे दिसला नाही. परंतु प्रत्यक्षदर्शीनी ताे पांडवलेणीच्या खालच्या बाजूस दाट झाडांमध्ये पळाल्याचे सांगितले.

त्यानुसार वन विभागाने त्या भागात पिंजरा ठेवण्याचे नियाेजन केले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून गाैळाणे शिवार व पाथर्डी गाव परिसरात व मळे भागातही बिबट्याचे दर्शन हाेत असल्याने या भाागतील रहिवासी बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाले आहेत. कदाचित हाच बिबट्या पांडवलेणी भागात आल्याचा संशयही वन विभागाने वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...