आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:लॅमराेड परिसरात बिबट्यांची दहशत

देवळाली कॅम्प2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॅमरोडवरील जमाल सॅनिटोरियममध्ये सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास बिबट्या गुरगुरल्याचा आणि गायीही हंबरत असल्याचा आवाज येत हाेता. तसेच गोठ्याच्या पत्र्यावर नखे घासल्याचा आवाज येत असल्याने येथील घरात झाेपलेले उन्हवणे कुटुंबीय जागे झाले. रूपाली उन्हवणे यांनी दरवाजा उघडून बाहेर बघितले असता पत्र्यावर दाेन बिबटे दिसले.

त्यांनी भावाला आवाज दिला. त्यांनी पत्र्यावर बॅटरीने प्रकाश टाकला, आरडाआेरडा केल्याने दाेन्ही बिबटे वेगवेगळ्या दिशेने पळून गेल्याचे उन्हवणे सांगितले. वनविभागाने तत्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...