आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिन्नर:‘भगवान’ धावून आल्याने बिबट्याच्या तावडीतून ‘त्या’ची सुटका; हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

सिन्नर / भरत घोटेकर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिबट्यावर प्रहार करत शेतात पाणी भरणाऱ्या लहान भावाचा वाचवला जीव

मक्याच्या शेतात पाणी भरणाऱ्या लहान भावावर बिबट्याने हल्ला केल्यानंतर मोठा भाऊ “भगवान’ ने काठीच्या साहाय्याने बिबट्यावर प्रहार करत लहान भावाचा जीव वाचवल्याची घटना तालुक्यातील दापूर येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. दापूरच्या तेलमाथा शिवारात बेलगाय मळ्यात झालेल्या घटनेत मंगेश सुधाकर आव्हाड (२२) हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठा भाऊ भगवान (३०) हा मंगेशसाठी देवदूत ठरल्याने परिसरात त्याच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

सुधाकर आव्हाड यांची दापूर परिसरातील बैलगाय मळ्यात शेती आहे. सुमारे पाच फूट उंच वाढलेल्या मक्याच्या शेतात मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा भगवान आणि छोटा मंगेश हे पिकाला पाणी देत होते. याच वेळी त्यांना शेतात बिबट्याचा बछडा नजरेस पडला. त्यामुळे भगवान याने शेततळ्यावर जात कुटुंबीयांना आवाज दिला. वडील सुधाकर आणि आई अलकाबाई आव्हाड हेही तळ्यावर आले. मात्र छोटा बछडा असल्याने काही करणार नाही, या अंदाजात पुन्हा मंगेश पाणी देण्यात व्यग्र झाला. याच दरम्यान, शेतात पाणी भरणाऱ्या मंगेशवर मक्यातून आलेल्या बिबट्याने झडप घातली. मदतीसाठी त्याने जोरात आरडाओरडा केल्याने शेततळ्यावर असलेल्या भगवानने जवळच पडलेल्या काठीने बिबट्यावर हल्ला चढवला.

पाठपुरावा करूनही दखल घेतली नाही
बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने दुपारी घटनास्थळी पिंजरा लावला. परिसरात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा वावर असून वन विभागाकडे वेळोवेळी उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.