आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याची भीती:बिबट्या तर ‘मुक्त’, कर्मचारी मात्र ‘बंदिस्त’, विद्यापीठाने सतर्कतेसाठी काढले थेट परिपत्रक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ परिसरात कुलगुुरूंच्या निवासस्थानाजवळ रविवारी रात्री बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केल्यानंतर विद्यापीठ कर्मचाऱ्यांत भीती पसरली असून कर्मचारी व अधिकारी कार्यालयाबाहेर पडतानाही घाबरत असून बहुतेक कार्यालयात राहणेच पसंत करत आहेत. विद्यापीठाने परिसरात वावरताना काळजी घ्यावी तसेच रात्री बाहेर पडताना शक्यताेवर काठी किंवा तत्सम साहित्य हातात घेऊन बाहेर पडावे याबाबत थेट परिपत्रकच काढले आहे. विद्यापीठ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याने कर्मचाऱ्यांसह परिसरातील रहिवाशांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

दीड महिन्यापूर्वी एका नागरिकावर बिबट्याने हल्ला करत त्याला जखमी केले हाेते. त्यानंतर पुन्हा बिबट्याचा वावर दिसल्याने विद्यापीठाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, वनविभागाने परिसरात पिंजरा लावत बिबट्याचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी विद्यापीठाने केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...