आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Leopards Jailed In Pathardi, Terror Still Lingering; According To The Farmers, There Is Still One Male And Two Calves In Navale Mala Area

पाथर्डीतील बिबट्या जेरबंद:दहशतीचे सावट अजूनही कायम; नवले मळा परिसरात अजूनही 1 नर, 2 बछडे असल्याची माहिती

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी गावातील मळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत वाढली होती. बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली शेतकरी व नागरीकांना कामे करावी लागत होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून नवले मळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. अखेर रविवारी पहाटेच्या वेळी या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.

पाथर्डी गावातील भगवंत नवले यांच्या मळ्यात स्थानिक शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे पाहावयास मिळाला. अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये व स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे सावट होते. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या ठिकाणी 15 दिवसांपूर्वी पिंजरा ठेवला होता. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. जयेश नवले यांना सकाळी विहिरीचे मोटार चालू करण्यासाठी गेले असताना बिबट्या जेरबंद झाल्याचे समजले. त्यानंतर या ठिकाणी स्थानिक शेतकरी विष्णू नवले, धीरज नवले, पोपट नवले, रोशन नवले, गणेश नवले, सर्वेश नवले, श्रेयश नवले यांच्यासह परिसरातील इतर शेतकऱ्यांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती.

अजूनही तीन बिबट्यांचा वावर

शेतकरी भाऊसाहेब नवले म्हणाले की,बिबट्या जेरबंद झाल्याने पाथर्डीतील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, अजूनही या भागात एक नर व दोन बछड्यांचा वावर असल्याचे आम्ही पाहिले आहे. बिबट्याच्या दहशतीचे सावट अजूनही कायम आहे. त्यामुळे वन विभागाने पुन्हा पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे.

बातम्या आणखी आहेत...