आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतूक कोंडीच्या समस्येतूून मुक्तता करणारा वाहतूक व्यवस्थापनाचा स्मार्ट प्रकल्प असो की साैरऊर्जेचा उपयोग करून स्मार्ट गावे निर्माण करणारा प्रकल्प. शालेय विद्यार्थ्यांनी अभिनव कल्पनांतून साकार केलेल्या विविध प्रकल्पांनी शिक्षकांसह लक्ष वेधले. रोबोटिक्स अॅण्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आरोग्य व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. पुणे, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिकच्या शाळा व महाविद्यालयांनी सहभाग घेतलानिमित्त होते, के. के. वाघ तंत्रनिकेतनतर्फे आयोजित राज्यस्तरीय प्रग्यान विज्ञान प्रदर्शनाचे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण करून त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी गेल्या दहा वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि नवनवीन शोधांशी संबंधित विविध मॉडेल्स बनवून, देशाच्या प्रगतीसाठी त्यांचा कसा वापर करता येईल हे सादर केले. उदघाटन इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअर्सचे प्रमुख महेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, प्राचार्य प्रकाश कडवे, डॉ. पी. एन. रसाळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.