आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सवात डीजे वाजवू द्या:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महानगर गणेशोत्सव महामंडळाचे साकडे

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री गणेशाेत्सवात विर्सजन मिरवणूकीत रात्री 12 वाजेपर्यंत डीजे वाजविण्यास परवानगी द्यावी, आणि त्यानंतर मिरवणूक संपेपर्यंत पारंपरिक वाद्य वाजवू द्यावेत, असे आदेश पोलीस आयुक्त यांना लेखी स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी नाशिक महानगर गणेशाेत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनाद्वारे साकडे घातले.

महानगर गणेशाेत्सव मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्या नेतृत्वाखाली निवडक पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात, डीजे वाजविण्यास लग्नकार्यात, दहीहंडीला परवानगी आहे. गणपती मिरवणुकीला विरोध का? इतर शहारामध्ये डॉल्बी वाजविण्यास परवानगी आहे. त्याचअनुषंगाने नाशिकमध्ये परवानगी मिळावी. तसेच, सार्वजनिक गणपती उत्सव, आंबेडकर जयंती, शिवजयंती, दहीहंडी. नवरात्र उत्सव व मोहर्रम काळात 2017 मध्ये ज्यांनी डीजे वाजवले त्यांना नोटीसा काढून पोलिस खात्याकडून कायदेशीर बाबींमध्ये अटकवले जात आहे.

उत्सावामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याच आराेप करण्यात आला आहे. गणेशाेत्सवात आरास बघण्यासाठी शहर, ग्रामीण भाागतून रात्री 12 वाजेपर्यंत गर्दी करीत असतात, त्याकाळात मद्याची दुकाने साेडून इतर हाॅटेल व्यवसाय सुरू ठेवून खाद्यपदार्थाच्या हातगाड्यांना परवानगी द्यावी, त्यामुळे भाविकांना उपाशीपाेटी राहवे लागणार नाही. या प्रसंगी रामसिंग बावरी, पोपटराव नागपुरे , बबलू परदेशी , सत्यम खंडाळे , बापू वाघ , राहुल सूर्यवंशी यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते .

गुन्हे कधी मागे घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती उत्सव, दहीहंडी, नवरात्र, आंबेडकर जयंती, मोहरम उत्सव काळात कार्यकत्यांवर व मंडळावर दाखल गुन्हे मागे घेण्याची घाेषणा केली. मात्र, अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी व पाेलिस आयुक्तालय स्तरावर कुठेलीही कारवाई हाेत नसल्याने त्याची अंमलबजावणी केल्यास गणेशाेत्सवसह पुढील सण आणखी जल्लाेष व उत्साहात साजरे हाेतील, अशी मागणी ही करण्यात आली.

पोलिस आयुक्तालय कडून जुने मागे घेण्यापेक्षा गुन्ह्यांच्या पार्श्वभूमी लक्षात घेता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून बंद पत्र लिहून वर्तणुकीची हमी घेतली जात आहे किमान यात्री अटींवर शेतीत आणावी असे मागणी करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...